गोंडवानाचा दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 01:51 IST2017-01-24T01:51:00+5:302017-01-24T01:51:00+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी ११.३०

Convocation ceremony of Gondwana on 13th February | गोंडवानाचा दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारीला

गोंडवानाचा दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारीला

कुलगुरूंची माहिती : विजय भटकर, रणजित मुशाहरी उपस्थित राहणार
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर हे दीक्षांत भाषण करणार असून विशेष अतिथी म्हणून मेघालयचे माजी राज्यपाल तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी रणजित मुशाहरी उपस्थित राहणार आहेत. सदर दीक्षांत समारंभात हिवाळी २०१५ व उन्हाळी २०१६ मध्ये पदवी व पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण १२ हजार ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. कल्याणकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या निर्देशानुसार २५३ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व दानदात्यांकडून विविध अभ्यासक्रमांना घोषीत करण्यात आलेले २४ सुवर्ण पदके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव दीपक जुनघरे, परीक्षा नियंत्रक जे. व्ही. दडवे आदी उपस्थित होते.

हिवाळी परीक्षेत ७८४ विद्यार्थी उत्तीर्ण
४गोंडवाना विद्यापीठांतर्गत उन्हाळी २०१६ या परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान व इतर शाखा मिळून पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण ११ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. हिवाळी २०१५ च्या परीक्षेत सर्व शाखा मिळून पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण ७८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांना पदवी देण्यात येणार आहे.

विद्यापीठातून तिघांनी मिळविली आचार्य पदवी
४आचार्य पदवीधारकांची अधिसूचना गोंडवाना विद्यापीठाने निर्गमित केलेली आहे. गोंडवाना विद्यापीठातून प्रथम आचार्य पदवी मिळविणारे अस्लम याकूब सूर्या (संगणकशास्त्र), जयवंत काशिनाथ शिंपी (शारीरिक शिक्षण) हे आचार्य पदवी मिळविणारे दुसरे विद्यार्थी आहेत. योगेश वामनराव थेरे यांनी (सुक्ष्मजीवशास्त्र) विषयात आचार्य पदवी प्राप्त केली असून सदर पदवी मिळविणारे तिसरे विद्यार्थी आहेत. या तिन्ही प्रज्ञावंतांना आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

सुवर्ण पदकाचे २४ प्रज्ञावंत मानकरी
४संध्या देवराव खेवले (एमए इंग्रजी) शांताराम पोटदुखे सुवर्ण पदक व विठोबाजी शेंडे सुवर्ण पदक, अस्मिता दिलीप कोथेवार (एमए मराठी) गोविंदराव मुनघाटे सुवर्ण पदक, श्यामप्रिया नामदेव मडावी (एमए हिंदी) स्व. डॉ. मथुराप्रसाद दुबे कुलदीप स्मृती सुवर्णपदक, दीक्षा विठ्ठल गायकवाड (एमए पॉली व प्राकृत) सुभद्रा धनवंत खोब्रागडे सुवर्ण पदक, प्रतीक्षा दिलीप कामडे (बीकॉम) स्व. शेषराव लक्ष्मणराव जगनाडे स्मृती सुवर्ण पदक, स्व. रामचंद्र चक्करवार स्मृती पदक व स्व. मामीडवार स्मृती पदक, मोनाली भैय्या तामगडे (एमबीए) सांबाशीव आर्इंचवार सुवर्ण पदक, अंकित शरदकुमार गुप्ता (एलएलबी) स्व. अ‍ॅड. ताराचंद खजांची शताब्दी स्मृती सुवर्ण पदक, ज्योती हरिषचंद्र झुरे (एमएससी) स्व. डॉ. वैभव दोंतुलवार स्मृती सुवर्ण पदक, सविता धर्मराव बन्सोड (एमए राज्यशास्त्र) स्व. वसंतराव दोंतुलवार स्मृती सुवर्ण पदक, प्रियंका भोरूलाल करूणाकर (बीए हिंदी वाङ्मय), कोमल दिलीप धनके (बीए भूगोल), सीमा अंबादास कोसे (बीए राज्यशास्त्र), प्रियंका मंगलदास वंजारी (बीए मानसशास्त्र), शेख नुरसाभाबानो इस्लामुद्दिन (बीए संगीत), जनार्धन शंकर पेरगुवार (बीए आंबेडकर विचारधारा), अंकित शरदकुमार गुप्ता (एलएलबी), रिया मुकेश जैन (एलएलबी) यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
४आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधून प्रथम येणाऱ्या दिगांबर श्रीहरी शेंडे (एमए मराठी), आदिवासी प्रवर्गातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल तृप्ती श्रीकृष्ण श्रीरामे (बीएससी) यांनाही सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Convocation ceremony of Gondwana on 13th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.