एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ विनाअट सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:53+5:302021-07-16T04:25:53+5:30
सामान्य प्रशासन विभाग क्र. टीआरएफ-२००० / ६ ऑगस्ट २००२च्या शासन निर्णयाद्वारे नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. ...

एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ विनाअट सुरू ठेवा
सामान्य प्रशासन विभाग क्र. टीआरएफ-२००० / ६ ऑगस्ट २००२च्या शासन निर्णयाद्वारे नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. त्यातील एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्त्याचा लाभ गट अ ते ड मधील सर्व पदधारकांना त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्याचे निर्देश आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आस्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे, त्यांना सदर योजनेचा लाभ अनुदेय नसेल ही अट घालून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ काढून टाकण्यात येत आहे. ही बाब कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी व हिरमोड करणारी आहे. या अटीमुळे सेवा कनिष्ठ कर्मचारी अधिक वेतन घेतो व ज्यांच्या सेवेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन मिळते, ही बाब भेदभाव करणारी असल्याचे आ. डॉ. देवराव होळी यांनी निवेदनात म्हटले आहे.