ग्रामपंचायत व ग्रामविकासाबाबत विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:40+5:302021-07-15T04:25:40+5:30
ग्रामसंवाद सरपंच संघ राज्य तालुका अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली तालुका कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष निवड करणे, ग्रामपंचायत पथदिवे ...

ग्रामपंचायत व ग्रामविकासाबाबत विचारमंथन
ग्रामसंवाद सरपंच संघ राज्य तालुका अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली तालुका कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष निवड करणे, ग्रामपंचायत पथदिवे बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांना कोरोना योध्दा घोषित करून ५० लाखांचे विमा कवच देणे, यासह विविध विषयांवर चर्चा झाली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसंवाद सरपंच संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद भगत, विदर्भ सरचिटणीस नीलेश पुलगमकर, विदर्भ अध्यक्ष दिगांबर धानाेरकर, प्रदेश सदस्य नंदा कुळसंगे, जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, तसेच पाच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. भगत व पुलगमकर यांनी संघटन मजबुती आणी समस्या साेडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी मानले.