शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जप्त रेतीतून होणार शौचालय व घरकुलांची बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 5:00 AM

यावर्षी रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया न झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात रेतीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अहेरी उपविभागात २ हजार ३५५ शौचालयाचे काम थंडबस्त्यात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बाराही पंचायत समितीमधील ग्रामपंचायतस्तरावर घरकुलांची कामे मंजूर करण्यात आली. या कामांना सुध्दा लाभार्थ्यांना रेती उपलब्ध न झाल्याने ही कामे सुध्दा रखडलेली आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकार, सीईओ कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने लाभार्थ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षण २०१२ मध्ये सुटलेल्या वाढीव कुटुंबाचे अहेरी उपविभागात तब्बल २ हजार ३५५ शौचालयाचे काम रेतीअभावी थांबले आहे. ही शौचालय व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कारवायादरम्यान जप्त केलेल्या रेतीचा वापर करण्यात येणार आहे. ही रेती शासकीय दराने संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.यावर्षी रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया न झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात रेतीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अहेरी उपविभागात २ हजार ३५५ शौचालयाचे काम थंडबस्त्यात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बाराही पंचायत समितीमधील ग्रामपंचायतस्तरावर घरकुलांची कामे मंजूर करण्यात आली. या कामांना सुध्दा लाभार्थ्यांना रेती उपलब्ध न झाल्याने ही कामे सुध्दा रखडलेली आहेत. वाढीव कुटुंबांसाठी मंजूर केलेल्या शौचालयाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. शासनाने ही शेवटची मुदत दिली आहे. या मुदतीत शौचालयाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने शौचालय व घरकुलांना जप्तीची रेती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला आहे.त्याअनुषंगाने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून रेती उपलब्ध झाल्यास गाव पातळीवरील शौचालय व घरकुलांची कामे मार्गी लागण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या मुद्याला होकार दर्शवित त्याअनुषंगाने कारवाई करण्यास सांगितले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अहेरी उपविभागातील बीडीओंना पत्र पाठवून रेतीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. अहेरीचे उपविभागीय अधिकारी राहूल गुप्ता यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठवून उपलब्ध असलेल्या रेतीसाठ्याबाबतची माहिती दिली. अहेरी तालुक्यात महसूल विभागाने जप्त केलेला वाळूसाठा उपलब्ध नाही. मात्र सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा माल येथे जप्त केलेला १४४ ब्रास इतका रेतीसाठा उपलब्ध आहे. प्रती ब्रास १ हजार ४१५ रुपये या शासकीय दरानुसार ग्रामपंचायतीकडून मागणी झाल्यास जप्त केलेला वाळूसाठा उपलब्ध करून देता येईल, असे पत्रात नमूद केले. शौचालय व घरकूल लाभार्थ्यांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जप्तीची रेती शासकीय दरात उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.बीडीओंच्या कामांबाबत नाराजीअहेरी उपविभागातील एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा तसेच चामोर्शी या तालुक्यात शासकीय योजनेतील शौचालय व घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत. जप्ती साठ्यातील रेती उपलब्ध करून देण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या कारभारांप्रती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. शासकीय कामात लेटलतीफपणा चालणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बीडीओंना सांगितले.

टॅग्स :sandवाळू