शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:37+5:302021-03-27T04:38:37+5:30
यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात केंद्र शासनाने पारीत केलेल्या कृषी ...

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने
यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक तहसिलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात केंद्र शासनाने पारीत केलेल्या कृषी कायद्यात शेतमालाला हमी भावाची हमी नसल्याने शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे. शेतकरी मागील चार महिन्यांपासून या विरोधात तिव्र आंदोलन करूनही शासन दूर्लक्ष करीत आहे. तसेच पेट्रोल, डीझेल, गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूंच्या कीमतीत भरमसाठ वाढ झाली असल्याने सर्वसामान्याचे जिवन जगणे कठीण् झाले आहे. कृषी कायदे रद्द करण्याबाबत तसेच भाववाढ नियंत्रित करण्याकरीता केंद्र शासनाला निर्देशीत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद याना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना तालुका कांग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समीतीचे सदस्य जिवन नाट, जि प सदस्य प्रभाकर तूलावी, प्रल्हाद कराडे माजी नगराध्यक्ष आशा तूलावी, माजी प. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती श्रीराम दूगा कांग्रेसचे प्रभारी अध्यक्ष मनोज दूनेदार महिला कांग्रेस अध्यक्ष जयश्री धाबेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते पूंडलिक निपाने, आनंदराव जांभूळकर, मनोज सिडाम, अरूण उईके, सिंधूबाई तितीरमारे, विमल हलामी, आसीफ शेख, न्याज सय्यद व कार्यकर्ते हजर होते.