Congress protests in Gadchiroli | काँग्रेसची गडचिरोलीत निदर्शने
काँग्रेसची गडचिरोलीत निदर्शने

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी : जबरदस्तीने विधेयक मंजूर केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा विरोध डावलून बहुमताच्या जोरावर लोकसभेत देशविघातक असणारे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक (एनआरसी) जबरदस्तीने मंजूर करून घेतले. या विधेयकाच्या विरोधात जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, पांडुरंग घोटेकर, एजाज शेख, जीतू मुनघाटे, तौफिक शेख, बाशीद शेख, राकेश रत्नावार आदीसह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने टाकलेले एक धोकादायक पाऊल आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. पुरेपूर व सारासर विचार या विधेयकाच्या चर्चेदरम्यान करण्यात आला नाही, असेही म्हटले आहे. निदर्शनेच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.
यशस्वीतेसाठी प्रतिक बारसिंगे, निखील खोब्रागडे, आशिष कन्नमवार, संतोष बारसिंगे, नीता वडेट्टीवार, अपर्णा खेवले, रोहिणी मसराम, मालू पुराम, आशा मेश्राम, एनएसयूआयचे जिल्हा महासचिव वैभव पळस्कर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Congress protests in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.