जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
By Admin | Updated: August 6, 2015 02:19 IST2015-08-06T02:19:20+5:302015-08-06T02:19:20+5:30
देसाईगंज व आरमोरीत निवेदन : २५ खासदारांचे निलंबन मागे घ्या; भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवा

जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
देसाईगंज/ आरमोरी : लोकसभेतील काँग्रेसच्या २५ खासदारांचे झालेले निलंबन रद्द करण्यात यावे तसेच राज्य व केंद्र सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना त्वरित हटविण्यात यावे, या मागणीवरून जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. बुधवारी देसाईगंज व आरमोरी येथील तहसीलदारांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे मागणाऱ्या लोकसभेतील काँग्रेसच्या २५ खासदारांना सोमवारी पाच दिवसांकरिता निलंबित करण्यात आले. या घटनेचा निषेध देसाईगंज तालुका कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रकरणातील मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणीही काँग्रेसच्या वतीने शासनाकडे एसडीओंमार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
भाजप सरकार सत्तारूढ झाल्याने महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये हुकूमशाही कारभार सुरू आहे. असे असतांनाही भ्रष्टाचाऱ्यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने एसडीओ नान्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, परसराम टिकले, शहजाद शेख, विलास ढोरे, निलोफर शेख, आरीफ खानानी, राजू रासेकर, सुनील सहारे, विक्की टुटेजा, राजेंद्र बुल्ले, रमेश पर्वतकार, नरेश शामदासानी उपस्थित होते.
सेवादल व आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी याच प्रकरणी तहसीलदार मनोहर वलथरे यांना निवेदन देण्यात आले. केंद्रातील भ्रष्ट मंत्री व विविध राज्याच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
यावेळी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजीव गारोदे, माजी जि. प. सभापती आनंदराव आकरे, चंदू वडपल्लीवार, वघाळाच्या सरपंच मनिषा दोनाडकर, मुखरू देशमुख, रामदास श्रीरामे, भोलेनाथ धानोरकर, दिलीप घोडाम, कमलेश खानदेशकर, अशोक भोयर, विलास हारगुळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, भूषण कांबळे, प्रवीण रहाटे, राकेश खेडकर, करण गिरडकर, मंगेश मानकर, रूपेश फुलबांधे, कैलाश चिटकुले, आकाश कांबळे, प्रवीण प्रधान, साहिल सय्यद, साबीर शेख, रूमदेव सहारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)