विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:37+5:30
आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, चामोर्शीच्या निशिगंधी इंग्लिश स्कूल व आलापल्लीच्या ग्लोबल मीडिया केरला मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबरदरम्यान आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, चामोर्शीच्या निशिगंधी इंग्लिश स्कूल व आलापल्लीच्या ग्लोबल मीडिया केरला मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
‘शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या मुख्य विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर होते. उद्घाटक म्हणून पं. स. सभापती बबीता उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, पं. स. उपसभापती यशवंत सुरपाम, प्राचार्य शरदचंद्र पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, उपशिक्षणाधिकारी रमेश उचे, प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम, जि. प. च्या माजी सदस्य लक्ष्मी मने, विज्ञान पर्यवेक्षक अमरसिंह गेडाम, शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा आदी उपस्थित होते.
यावेळी फरेंद्र कुत्तीरकर व इतर मान्यवरांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत मार्गदर्शन केले. संचालन क्रिष्णा खरकाटे यांनी केले तर आभार प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांनी मानले.
विजेते स्पर्धक
प्राथमिक गटातून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची मृण्मयी भाकरे प्रथम, निशिगंधा इंग्लिश मीडियम स्कूल चामोर्शीचा अनिरूद्ध भांडेकर द्वितीय तर आलापल्लीच्या ग्लोबल केरला मॉडेल स्कूलचा विद्यार्थी अंशप्रित सिंग सलुजा याने तृतीय क्रमांक पटकाविला. आदिवासी गटातून जारावंडी जि. प. शाळेची अपेक्षा गुरनुले हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शिक्षकांमधून अशोक बोरकुटे, नरेश रामटेके, रमेश रामटेके, नीकेश बन्सोड यांनी यश मिळविले.