शिवराजपुरात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:18+5:302021-09-02T05:19:18+5:30
२३ वर्षांपासून परंपरा ‘एक गाव, एक गणपती’ कुरुड : देसाईगंज तालुक्यातील ७ किमी अंतरावरील शिवराजपूर येथे यंदाही ‘एक गाव, ...

शिवराजपुरात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना साकारणार
२३ वर्षांपासून परंपरा ‘एक गाव, एक गणपती’
कुरुड : देसाईगंज तालुक्यातील ७ किमी अंतरावरील शिवराजपूर येथे यंदाही ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा जोपासली जात असल्याची माहिती बालगणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष पितांबर मेश्राम यांनी दिली.
दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळातही ‘एक गाव, एक गणपती’ची साधेपणाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षीसुद्धा एक गणपती मांडून काेराेना नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांची विचारधारा आताही गावकरी जोपासत आहेत. उत्सवाचे २४वे वर्ष सुरू आहे. या गावात कुटुंब ३०६ आहेत, तर ११ दिवस विविध उपक्रम राबविले जात होते; पण कोरोनामुळे यावर्षी कीर्तन आणि विविध स्पर्धा होणार नसल्याने उत्साह कमी आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी प्रत्येक मंडळाला माहिती देत एक गाव एक गणपती संकल्पना व आरोग्यविषयक लसीकरण, रक्तदान असे उपक्रम घेऊन मंडळातर्फे मदतीचा हाथ समोर करावे, असे आवाहन केले जात आहे.