ठाणेगावात जंतनाशक फवारणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:31+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीअंतर्गत रस्ते, नाल्या व गल्लीबोळात जंतनाशक फवारणी करण्यात आली. याशिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी घरी व परिसरात स्वच्छता पाळावी, वैयक्तिक स्वच्छतेव भर द्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Complete spraying of pesticide in Thanegaon | ठाणेगावात जंतनाशक फवारणी पूर्ण

ठाणेगावात जंतनाशक फवारणी पूर्ण

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेवर भर : गावागावात ठेवले जात आहे डिस्टन्स

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणेगाव : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत ठाणेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात जंतनाशक फवारणीचे काम आटोपले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीअंतर्गत रस्ते, नाल्या व गल्लीबोळात जंतनाशक फवारणी करण्यात आली. याशिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी घरी व परिसरात स्वच्छता पाळावी, वैयक्तिक स्वच्छतेव भर द्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बाहेर गावाहून गावात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे, अनोळखी वाटल्यास त्याची नोंद ठेवली जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर प्रचंड भर दिला जात आहे. किराणा सामान व भाजीपाला खरेदी करताना नागरिक सामाजिक अंतर राखत आहेत.
ठाणेगाव परिसरातील वासाळा, वणखी, चामोर्शी आदी गावातही ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती सुरू असून कोरोनाविरूद्ध लोक एकवटले आहेत.

Web Title: Complete spraying of pesticide in Thanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.