शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनुकंपाधारक आक्रमक

By admin | Updated: December 28, 2016 03:08 IST

शासकीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने येरझारा मारल्यानंतरही शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत

विजय खरवडे यांची माहिती : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार गडचिरोली : शासकीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने येरझारा मारल्यानंतरही शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता जिल्ह्यातील सर्व अनुकंपाधारक एकवटले असून येत्या आठ दिवसात मुंबईच्या मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, वन विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११७ आदिवासी विकास विभागाअंतर्गत ३० तसेच इतर विभागाअंतर्गतही अनेक अनुकंपाधारक गेल्या सात-आठ वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधीही यासंदर्भात उदासीन आहेत, असा आरोप उपस्थित अनुकंपाधारकांनी केला. मंगळवारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विभागातील अनुकंपाधारकांमधून वर्ग ३ व ४ ची पदे भरण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, अशी माहिती खरवडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला मनोज सयाम, चंद्रशेखर उसेंडी, जयदेव नैताम, सुषमा किरंगे, प्रभाकर पदा, अमोल किरंगे, शुभांगी कोहळे, मनोज नरूले, आशिष कुमरे, लतीफ भोयर, श्वेता जिवने, शारदा पेंदाम आदी अनुकंपाधारक उपस्थित होते.