प्रधान सचिवांनी साधला आदिवासींशी संवाद

By Admin | Updated: June 21, 2014 23:57 IST2014-06-21T23:57:14+5:302014-06-21T23:57:14+5:30

आदिवासी विकास विभागाचे प्रधानसचिव मुकेश खुल्लर यांनी आज शनिवारी आलापल्ली व भामरागड येथे दौरा केला. दरम्यान त्यांनी भामरागड येथील तहसील कार्यालयात आदिवासी नागरिकांशी संवाद

Communication with Adivasi was done by the Principal Secretary | प्रधान सचिवांनी साधला आदिवासींशी संवाद

प्रधान सचिवांनी साधला आदिवासींशी संवाद

विविध समस्या जाणल्या : प्रकाश आमटे यांच्याशीही केली चर्चा
भामरागड : आदिवासी विकास विभागाचे प्रधानसचिव मुकेश खुल्लर यांनी आज शनिवारी आलापल्ली व भामरागड येथे दौरा केला. दरम्यान त्यांनी भामरागड येथील तहसील कार्यालयात आदिवासी नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी भामरागड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत चर्चा केली. तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी दुभाषिकाच्या सहाय्याने आदिवासी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घरकूल, शिक्षण, आरोग्य, कृषी याबाबत सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी आदिवासी सेवक सब्बर मोगल बेग यांनी प्रकल्प कार्यालयातील रिक्त पदांमुळे विभागाच्या शासकीय योजना आदिवासींपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. आदिवासी नागरिकांच्या विविध समस्याही मांडल्या. यावर प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी राज्यपालाने ९ जून रोजी एक नवा आदेश पारित केला असून या आदेशानुसार आदिवासी विकास विभागातील तसेच तालुकास्तरावरील अन्य अधिकाऱ्यांचे पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले. हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन कार्यप्रणाली जाणून घेतली. यावेळी त्यांनी समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी आदिवासी नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त (शिक्षण) विनोद पाटील, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला, भामरागडचे प्रकल्प अधिकारी सोनकवडे, भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, भामरागडचे वनपरिक्षेत्राधिकारी खोब्रागडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Communication with Adivasi was done by the Principal Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.