धुळीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:50+5:302021-03-17T04:37:50+5:30
आलापल्ली : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये गिट्टीचा चुरा टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. या गिट्टीवरून वाहन गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात ...

धुळीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त
आलापल्ली : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये गिट्टीचा चुरा टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. या गिट्टीवरून वाहन गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात धूळ उडते. या धुळीमुळे आलापल्लीवासींयाचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
रस्त्यावरील धूळ नागरिकांच्या घर व दुकानामध्ये शिरत आहे. त्यामुळे दुकानदार व नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे निराकरण करण्यासाठी व्यापारी बांधवांनी सरपंच शंकर मेश्राम यांच्याकडे धाव घेतली. सरपंंचांनी शिष्टमंडळ सोबत घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि त्वरित राेड दुरुस्त करावा आणि रोडवर पसरलेली धूळ साफ करावी, अशी मागणी सा.बां.वि.चे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांच्याकडे निवेदन केली. निवेदन देतेवेळी सरपंच शंकर मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गड्डमवार, व्यापारी संघटना अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, व्यापारी संघटना उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार, व्यापारी संघटना सदस्य राकेश गण्यारपवार, मिलिंद खोंड आदींची उपस्थिती होती.