शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कोनसरी प्रकल्पावर नागरिकांचे एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

लॉयड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या या लोहखनिज प्रकल्पासाठी कोनसरी येथील जागा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. सदर कंपनीला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील जागा लोहखनिज काढण्यासाठी सरकारने लिजवर दिली आहे.

ठळक मुद्देजनसुनावणीत गर्दी : क्षेत्राच्या विकासाला देणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील कोनसरी येथे उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनावणीत परिसरातील सर्व नागरिकांनी एकमताने या प्रकल्पाला सहकार्य करण्याची हमी देत प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची एकमुखी मागणी केली. या सुनावणीला मोठ्या संख्येने चामोर्शीसह एटापल्ली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.लॉयड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या या लोहखनिज प्रकल्पासाठी कोनसरी येथील जागा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. सदर कंपनीला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील जागा लोहखनिज काढण्यासाठी सरकारने लिजवर दिली आहे. परंतू नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे लोहखनिजावरील प्रक्रिया उद्योगासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील जागा निवडण्यात आली. दरम्यान त्या भागातील पर्यावरणविषयक समस्या जाणून घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कोनसरीत जनसुनावणी ठेवली होती. यावेळी चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मधुकर लाड, चामोर्शीचे तहसीलदार गंगथडे, लॉयड् मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर प्रामुख्याने उपस्थित होते.या जनसुनावणीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. त्यात या क्षेत्राच्या विकासात्मक सोयीसुविधांसाठी २.२५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील नागरिक व बेरोजगारांनी संबंधित अधिकाऱ्यापुढे आपली व्यथा मांडताना प्रकल्प लवकर सुरू करून बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली.एटापल्लीतील बेरोजगारांना प्राधान्य द्याया जनसुनावणीला एटापल्ली तालुक्यातूनही मोठ्या संख्येने बेरोजगार उपस्थित होते. हा प्रकल्प आमच्या तालुक्यातच घ्या अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा मांडली. परंतू नक्षल अडचणीमुळे त्या भागात प्रकल्प लावण्यास मान्यता मिळाली नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी या तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना कोनसरीच्या प्रकल्पात नोकरी देण्यास प्राधान्य देण्याची मागणी केली. त्याला संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.