धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:32+5:30

१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केल्याने लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. जवळपास एप्रिल महिन्यापासून बऱ्या प्रमाणात लसीकरण हाेऊ लागले. ग्रामीण भागातील नागरिकही लस घेत हाेते. 

Citizens' back to carnage vaccination due to paddy cultivation | धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

ठळक मुद्देग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामात व्यस्त

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जुलै महिन्यापासून धान राेवणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याने या कालावधीत काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. 
१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केल्याने लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. जवळपास एप्रिल महिन्यापासून बऱ्या प्रमाणात लसीकरण हाेऊ लागले. ग्रामीण भागातील नागरिकही लस घेत हाेते. 
मात्र जुलै महिन्यापासून राेवणीच्या कामाला सुरुवात झाल्याने लसीकरणाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. काेराेनाची लस घेतल्यानंतर अंगदुखीचा त्रास एक ते दाेन दिवस हाेतो. 
राेवणीच्या कालावधीत दाेन दिवस घरी राहणे शक्य हाेत नाही. त्यामुळे गावात शिबिरांचे   आयाेजन  करूनही  नागरिक लस घेत नसल्याचे दिसून येत आहे. 

एक दिवस घरी थांबणेही हाेते अशक्य
काेराेनाची लस घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी अंगदुखीचा त्रास जाणवला. काही नागरिकांना तर थंडी वाजून तापसुद्धा येतो. सध्या धान राेवणीच्या हंगाम सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतात काम करावे लागते. अशास्थितीत ताप आला म्हणून घरी थांबणे कठिण हाेते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक व शेतकरी लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. 
 
२६ जून ते २ जुलैच्या आठवड्यात विक्रमी लसीकरण

- २६ जून ते २ जुलै या आठवड्यात आजपर्यंतच्या कालावधीतील सर्वाधिक लसीकरण झाले असल्याचे दिसून येते. या आठवड्यात ४१ हजार १९७ नागरिकांनी पहिला डाेज, २ हजार ३४३ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. त्यानंतर मात्र लस घेण्याचे प्रमाण कमी हाेण्यास सुरुवात झाली. 
- त्यानंतरच्या आठवड्यात १४ हजार ८०२ नागरिकांनी पहिला डाेज तर १ हजार ९४८ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. राेवणीनंतर लसीकरण पुन्हा वेग घेईल.

Web Title: Citizens' back to carnage vaccination due to paddy cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.