सर्कलनिहाय आढावा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:12 IST2018-07-15T00:11:10+5:302018-07-15T00:12:12+5:30
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून भाजपने राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर संघटनात्मक विस्ताराचा कार्यक्रम सुरू केला आहे.

सर्कलनिहाय आढावा घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून भाजपने राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर संघटनात्मक विस्ताराचा कार्यक्रम सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनाची वस्तू स्थिती जाणून घेण्यासाठी आपण सर्कलनिहाय बैठका लावून आढावा घेऊ, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी केले.
शुक्रवारी येथील सर्कीट हाऊसमध्ये भाजपचे जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला प्रामुख्याने जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, प्रमोद पिपरे, महिला आघाडीच्या ताराबाई कोटांगले, महिला जिल्हा प्रभारी रेखा डोळस, रवीकिरण समर्थ, सुरेश मांडवगडे, प्रकाश गेडाम, दामोधर अरिगेला, स्वप्नील वरघंटे, पं.स. सभापती आनंद भांडेकर, अनिल पोहणकर, पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी एक बूथ, २५ युथ ही समिती २० जुलैपर्यंत गठीत करावी, १४ ते ५ मे या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचविली पाहिजे, असे सांगितले.