पोर्ला येथील रेती तस्करी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:47 IST2021-04-30T04:47:07+5:302021-04-30T04:47:07+5:30

जिल्ह्यात रेतीघाट घेणारे कंत्राटदार दररोज रात्री अवैधपणे रेतीचा उपसा करून अवैद्य ठिकाणी रेतीची साठवणूक करतात व त्या ठिकाणी छापा ...

CID probe into sand smuggling case in Porla | पोर्ला येथील रेती तस्करी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

पोर्ला येथील रेती तस्करी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

जिल्ह्यात रेतीघाट घेणारे कंत्राटदार दररोज रात्री अवैधपणे रेतीचा उपसा करून अवैद्य ठिकाणी रेतीची साठवणूक करतात व त्या ठिकाणी छापा टाकून पंचनामे झाल्यास त्याला अवैध तस्कर असल्याचे सांगून प्रकरण संगनमताने दडपून टाकतात. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रकारे रेती घाट घेणारे कंत्राटदार, महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात रेती चोरी हाेत आहे. अज्ञात रेती तस्करांवर नाममात्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. रेती तस्करी प्रकरणी पंचनामे होत आहेत. मात्र, अजूनपर्यंत एकाही रेती तस्करावर गुन्हा दाखल होऊन शिक्षा झालेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होऊनही जिल्ह्यात गुन्हे दाखल व शिक्षा का होत नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये महसूल बुडत असून, त्यास जबाबदार असणारे कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी या सर्वांची सीआयडीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमित घाट घेणाऱ्या कंत्राटदारांची व त्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

Web Title: CID probe into sand smuggling case in Porla