चायनीज वस्तूंनी बाजारपेठ व्यापली
By Admin | Updated: October 22, 2014 23:18 IST2014-10-22T23:18:31+5:302014-10-22T23:18:31+5:30
चायनाच्या वस्तूंनी संपुर्ण भारतीय बाजारपेठ काबीज केली असून यापासून दीपोत्सवाच्या वस्तूही सुटल्या नाहीत. गडचिरोलीच्या बाजारात मेड इन चायना लिहिलेल्या वस्तूंनी गर्दी केली आहे.

चायनीज वस्तूंनी बाजारपेठ व्यापली
गडचिरोली : चायनाच्या वस्तूंनी संपुर्ण भारतीय बाजारपेठ काबीज केली असून यापासून दीपोत्सवाच्या वस्तूही सुटल्या नाहीत. गडचिरोलीच्या बाजारात मेड इन चायना लिहिलेल्या वस्तूंनी गर्दी केली आहे.
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानल्या जातो. या सना निमित्त प्रत्येक नागरिक आपापाल्यापरिने जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी करतात. या सनाला विविध वस्तूंची खरेदी केली जात असल्याने दुकानदार एका महिन्यापूर्वीच माल आणून ठेवतात. या सणासाठी कपडे, गोड पदार्थ, फराळ, फटाके, रांगोळी, पणत्या, लायटिंगच्या माळा या सारख्या अनेक वस्तूंची खरेदी केली जाते.
चायनीज वस्तू टिकावू नसल्या तरी स्वस्त मात्र मस्त राहत असल्याने चायनाच्या वस्तू भारतीय ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस उतरल्या आहेत. दिवाळीच्या सनाच्या निमित्ताने हजारो कोटीची उलाढाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चायनीज कंपण्यांनी दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात बनविण्यास सुरूवात केली आहे. या वस्तू उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून बनविल्या जात असल्याने दिसण्यासाठी अत्यंत आकर्षक असतात व भारतीय कंपन्यांच्या उत्पादनाच्या तुलनेत या वस्तू स्वस्त राहत असल्याने या वस्तुकडे ग्राहक नेहमीच आकर्षित होतात. यावर्षी बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक पणत्या, आकाश दिवे, प्लॉवर पॉट, झुंबर, खेळण्याच्या बंदूक, म्युझीक असलेल्या बंदूक, एवढेच नाही तर फटाकेही चायनीज कंपन्यांचे असल्याचे दिसून येते. भारतीय वस्तूंच्या तुलनेत चायनाच्या वस्तूंची किंमत अर्धी असल्याचे दिसून येते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नुकताच नारा दिला आहे. ज्या प्रमाणे जपान, अमेरिका व चायनाच्या वस्तूंनी संपूर्ण जग व्यापले आहे. त्याचप्रमाणे भारतीय मालाचीही निर्यात झाली पाहिजे असे आवाहनही केले होते. मात्र टाचणीपासून ते मोठमोठ्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठ व्यापायला लागली आहे. महत्वाचे म्हणजे या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
पंतप्रधानानी दिलेला नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भारताला चीन प्रमाणेच अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे, लागेल. तेव्हाच या चायनीज वस्तूंना शह देऊन बाजारपेठेवर भारतीय वस्तूंचा कब्जा करणे शक्य होणार आहे. चायनाच्या कंपन्या येथील संस्कृतीचा निट अभ्यास करून ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू तयार करीत असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)