काेटरी बुद्ध विहाराच्या बांधकामाची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:07+5:302021-09-05T04:41:07+5:30
काेटरी बुद्ध विहाराच्या विकासाकरिता २०१७-१८ या वर्षात ७४ लाख २० हजार १२२ रुपयांचा निधी वन विभागाला उपलब्ध करून देण्यात ...

काेटरी बुद्ध विहाराच्या बांधकामाची चाैकशी करा
काेटरी बुद्ध विहाराच्या विकासाकरिता २०१७-१८ या वर्षात ७४ लाख २० हजार १२२ रुपयांचा निधी वन विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. मार्च २०१८ मध्ये ३३ लाख ८६ हजार ७४२ रुपयांचा निधी खर्च झाला असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा ४० लाख ३३ हजार ३८० रुपयांच्या निधीची उचल करण्यात आली. मात्र, एवढे काम झाले नाही. यासाठी घाेटचे वनपरिक्षेत्राधिकारी तनपुरे, आलापल्लीचे एसीएफ (तेंदू) पवार व उपवनसंरक्षक तांबे जबाबदार आहेत. या बांधकामाची चाैकशी केल्यास फार माेठे घबाड समाेर येणार आहे. याची चाैकशी करण्याची मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष डाॅ. नामदेव खाेब्रागडे यांनी केली आहे. सदर निवेदन वनसंरक्षक यांच्यासह मुख्यमंत्री, प्रधान सचिव (वने), अप्पर मुख्य सचिव (दक्षता), प्रधान मुख्य वनसंरक्षक, विभागीय आयुक्त यांना पाठविले आहे.