शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

By admin | Updated: January 30, 2016 01:47 IST

स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुख्य रस्ते केले मोकळे : नगर पंचायत प्रशासनाचा पुढाकारचामोर्शी : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारला नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने गडचिरोलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खताचे ढिगारे काढून अतिक्रमण हटविण्यात आले. याशिवाय या मार्गावरील वाढलेली झाडेझुडपांची तोडणी करून रस्ते मोकळे करण्यात आले. चामोर्शी शहरात आंतरराष्ट्रीय मार्गावर असलेल्या छोट्या-मोठ्या दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावरही दुकानांमुळे अपघातांची शक्यता वाढली होती. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा चामोर्शी नगर पंचायत प्रशासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून स्वत:हून आपले अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. चामोर्शी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करावे. तसेच अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाने केले आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी चामोर्शीतील अंतर्गत रस्ते व नालीवरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शुक्रवारी अतिक्रमण कारवाईदरम्यान नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, आरोग्य सभापती विजय शातलवार, नगरसेवक शामराव लटारे, रामेश्वर सेलुकर, वैभव भिवापुरे व नगर पंचायतीचे कर्मचारी रमेश धोडरे, श्रीकांत नैताम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)