चामोर्शीत लोटला अलोट जनसागर
By Admin | Updated: May 12, 2014 23:41 IST2014-05-12T23:41:05+5:302014-05-12T23:41:05+5:30
मुरी जंगल परिसरात पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून अभियानावरून परतणार्या पोलीस जवानांचे वाहन उडवून दिले.

चामोर्शीत लोटला अलोट जनसागर
चामोर्शी : मुरमुरी जंगल परिसरात पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून अभियानावरून परतणार्या पोलीस जवानांचे वाहन उडवून दिले. यात चामोर्शी येथील सी-६0 पथकात कार्यरत रोशन हनुमंत डंबारे हा शहीद झाला. पोलीस विभागाने त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या सुपूर्द केल्यानंतर सोमवारी सकाळी ११.३0 वाजता चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंंडा घाटावर शहीद जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यावसायिकांनी शहरातील १00 टक्के दुकाने बंद ठेवून भावपूर्ण o्रद्धांजली अर्पण केली.o्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शहीद रोशनचे कुटुंबीय व त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान यावेळी सार्यांचेच डोळे पाणावले होते. बाजारपेठ बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. (शहर प्रतिनिधी) सेवानवृत्त नायब तहसीलदार हनुमंत डंबारे यांच्या निवासस्थानापासून शहीद रोशन डंबारे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी चामोर्शी शहर तसेच परिसरातील अलोट जनसमुदाय लोटला होता. यावेळी चामोर्शी शहरातील प्रत्येक घरातील नागरिकांनी अंत्ययात्रेत सहभागी होऊन शहीद रोशनला तीन महिन्याच्या चिमुकलीचे पितृछत्र हरवले सी-६0 पथकात कार्यरत रोशन हनुमंत डंबारे हे चामोर्शी येथील रहिवासी होते, त्यांचे वडील सेवानवृत्त तहसीलदार आहेत. रोशन हा आपली पत्नी व तीन महिन्याच्या चिमुकल्या मुलीसह गडचिरोली शहरातील रामनगर परिसरात राहत होता. रोशन सी-६0 पथकासमवेत पावीमुरांडा-मुरमुरी जगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवून वाहनाने परत येत होता. दरम्यात, नक्षल्यांनी त्यांचे वाहन भूसुरूंग स्फोटात उडवून दिल्याने रोशन जागीच ठार झाला. यामुळे तीन महिन्याच्या चिमुकलीचे पितृछत्र हरविले. तसेच काळाच्या नियतीने घाला घातल्याने रोशनच्या पत्नीवर प्रचंड आघात झाला. एक महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलीचा नामकरण विधी पार पडला होता. त्यांच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.