चामोर्शी येथे चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:24 IST2021-06-27T04:24:16+5:302021-06-27T04:24:16+5:30
यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे, विजय कोमेरवार, स्वप्निल वरघंटे, पंचायत समितीचे उपसभापती वंदना गौरकर, भाजपा तालुका ...

चामोर्शी येथे चक्काजाम
यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे, विजय कोमेरवार, स्वप्निल वरघंटे, पंचायत समितीचे उपसभापती वंदना गौरकर, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष भास्कर बुरे, जिल्हा महामंत्री आशीष पिपरे, प्रतीक राठी व शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी आंदाेलकांना स्थानबद्ध केले. चक्काजाम आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटोला आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आग लावण्यास मज्जाव केला. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा रोष अनावर झाला होता. परंतु आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. यावेळी बस स्टँड येथे काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
===Photopath===
260621\img-20210626-wa0126.jpg
===Caption===
ओबीसी आरक्षणाविरोधात भाजपाचे जेलभरो व चक्काजाम आंदोलन फोटो