स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी आरमोरीत चक्काजाम आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:41 IST2021-09-21T04:41:07+5:302021-09-21T04:41:07+5:30
तत्कालीन गट ग्रामपंचायत अरसोडामधील अरसोडा हे गाव आरमोरी नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे; परंतु त्याच गट ग्रामपंचायतमधील रवी, ...

स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी आरमोरीत चक्काजाम आंदाेलन
तत्कालीन गट ग्रामपंचायत अरसोडामधील अरसोडा हे गाव आरमोरी नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे; परंतु त्याच गट ग्रामपंचायतमधील रवी, मुल्लुरचक हे गाव नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. तीन वर्षांपासून दोन्ही गावे कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही, तसेच सदर दोन्ही गावांत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना ग्रामपंचायतअभावी जनतेला मिळत नसून दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर यांना ८०० ते ९०० लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्याच धर्तीवर विशेष बाब म्हणून रवी व मुल्लुरचक या ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा किंवा जवळपासच्या वघाळा ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी नायब तहसीलदार चापले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते, आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम, पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये, नगरसेवक माणिक भोयर, सुरेश मरापा, विठोबा कामथे, सुमित्रा तामसेटवार, प्रीतम धोडणे, राजकुमार नदंरधने, नरेंद्र गजभिये, तामरशा मरापा, शामराव शिलार, शिवदास चौके, ब्रह्मदास कवासे, सजय कामथे, श्रीधर मरापा, प्रल्हाद कवासे, कारुजी चडीकार, नीलकंठ सावसाकडे, मुखरू सावसाकडे यांच्यासह रवी मुल्लुरचक येथील गावकरी यावेळी उपस्थित होते.
बाॅक्स :
शासकीय योजना व साेयीसुविधांचा लाभ मिळेना
आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक ही गावे गेल्या तीन वर्षांपूर्वी अरसोडा ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट होती; परंतु अरसोडा हे गाव आरमोरी नगर परिषदेत समाविष्ट झाल्याने रवी, मुल्लुरचक ही गावे निराधार झाली. प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्यामुळे संविधानिक हक्कापासून दोन्ही गावे वंचित आहेत. येथील नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळत नसल्याने नागरिकांना घरकुल, वीज, पाणी, रोजगार, सिंचन, शेती उपयोगी कामे, शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.
200921\1759-img-20210920-wa0055.jpg
रवी, मुलूरचक ग्रावला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करताना माजी आ .आनंदराव गेडाम व गावकरी