अंशदान कपातीचा हिशेब देण्याचे सीईओ यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:48+5:302021-06-18T04:25:48+5:30
पंचायत समिती स्तरावरील सहायक लेखा अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक यांची मदत घ्यावी, असे ...

अंशदान कपातीचा हिशेब देण्याचे सीईओ यांचे निर्देश
पंचायत समिती स्तरावरील सहायक लेखा अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक यांची मदत घ्यावी, असे निर्देश गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. या कामाकरिता आवश्यकतेनुसार डीसीपीएसधारक शिक्षकांची नियुक्ती करावी. मासिक देयके, ऑनलाइन सुरू झाल्याच्या कालावधीपासूनची माहिती संकलित करताना केंद्रस्तरावरील शालार्थ देयके संकलन करणाऱ्या संबंधित शिक्षकांची मदत घ्यावी. विहीत प्रपत्रातील माहिती भरून २० दिवसांच्या आत सादर करावे. जुलैच्या प्रथम आठवड्यात आढावा बैठक घेतली जाईल, असे पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, या समस्या साेडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला हाेता.
बाॅक्स .......
सीईओंच्या पुढाकाराने अनेक समस्या मार्गी
जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत. यासाठी संबंधित संघटनांनी मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला हाेता. मात्र या समस्या मार्गी लागत नव्हत्या. कुमार आशिर्वाद यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी आशिर्वाद यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.