गडचिरोलीत केंद्रीय विद्यालय द्या; स्मृती इराणींना साकडे

By Admin | Updated: August 6, 2015 02:13 IST2015-08-06T02:13:56+5:302015-08-06T02:13:56+5:30

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील घोट येथे चालविण्यात येत

Central School in Gadchiroli; Smriti Irani | गडचिरोलीत केंद्रीय विद्यालय द्या; स्मृती इराणींना साकडे

गडचिरोलीत केंद्रीय विद्यालय द्या; स्मृती इराणींना साकडे

निवेदन : जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रश्नांवर चर्चा
गडचिरोली : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील घोट येथे चालविण्यात येत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी मंगळवारी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
घोट येथील जवाहर विद्यालयाची इमारत वन विभागाच्या एनओसी नसल्यामुळे रखडली आहे. यासंदर्भात मंत्रालयस्तरावरून पाठपुरावा करावा, तसेच येथे थ्री-जी ब्रॉन्डबँड सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, कायमस्वरूपी शिक्षकांची येथे नेमणूक करावी आदी मागण्यांबाबत खासदारांनी मंत्रीमहोदयांशी चर्चा केली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी नेते यांनी स्मृती इराणी यांच्याकडे केली. त्यांनी या सर्व मुद्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Central School in Gadchiroli; Smriti Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.