शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

लोकमत सखी सन्मान अवॉर्डचा सोहळा रंगला

By admin | Updated: October 26, 2016 01:52 IST

लोकमतच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वावान महिलांचा लोकमत सखी सन्मान अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.

कर्तबगार रणरागिणींचा गौरव : देखणा व नेत्रदीपक सोहळा; लोकमत वृत्तपत्र नव्हे तर लोकचळवळ झाल्याचा मान्यवरांचा सूरगडचिरोली : लोकमतच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वावान महिलांचा लोकमत सखी सन्मान अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. प्रेस क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, गुरूदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक गीताचार्य बंडोपंत बोढेकर, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, रंगोली साडी सेंटरच्या संचालक पुष्पलता देवकुले आदी उपस्थित होते. याप्रसंगी गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक बंडोपंत बोढेकर म्हणाले, युवक, युवती व महिलांनी टीव्ही, मोबाईल, कम्पुटरच्या नादात गुरफटून राहू नये, पुस्तक वाचनाने माणसाचे आयुष्य घडते. तसेच त्यातून संस्कारही होतात. त्यामुळे भावी पिढीला आत्मविश्वासाने परिपूर्ण व चारित्र्य संपन्न बनविण्यासाठी लोकमत सखी सदस्यांसह सर्व महिलांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. लोकमत समुहातर्फे लोकमत सखी मंच व इतर इव्हेंट चालविले जातात. यातून महिलांच्या कलाकौशल्याला मोठा वाव मिळत आहे, असे मनोहर हेपट यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले, लोकमत समूहाने सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. लोकमतने सामाजिक बांधिलकी जपून निर्भिड, निष्पक्ष भावनेने सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे, असे सांगितले. भाग्यवान खोब्रागडे म्हणाले की, सकाळी लोकमत वृत्तपत्र वाचले की, जगात सुरू असलेल्या घडामोडींची अद्यावत माहिती मिळते. लोकमत आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. लोकमत समूहाचा आता वटवृक्षासारखा विस्तार झाला आहे.अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, महिलांच्या कार्याचा ठसा उमटविण्याचे काम लोकमत सखी मंचतर्फे सातत्याने सुरू आहे. महिलांमध्ये असलेल्या सुप्त, कला गुण व शक्तींचा आविष्कार घडविण्यास लोकमत समूह महत्त्वाची भूमिका बजावित आहे. माजी खा. मारोतराव कोवासे म्हणाले, लोकमत समूहाने महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. लोकमतने सुरू केलेल्या चळवळीतून अनेक महिला विविध क्षेत्रात पुढे येत आहेत. एकूणच लोकमत हे वृत्तपत्र नसूून महाराष्ट्रातील एक मोठी चळवळ आहे. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी व सखी मंचच्या संस्थापक दिवंगत ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला मालार्पण करून दीपप्रज्ज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, संचालन नरेंद्र उंदीरवाडे यांनी केले तर आभार लोकमत इव्हेंटचे चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा प्रभारी अनिल कडुकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या संयोजिका प्रीती मेश्राम, युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, बाल विकास मंचच्या संयोजिक किरण पवार, समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनील चौरसिया, दिलीप दहेलकर, अमोल श्रीकोंडावार, विकास चौधरी, सखी मंचच्या सदस्य मृणाल उरकुडे, कल्पना लाड, पुष्पा पाठक, वंदना दरेकर, शारदा खंडागळे, अर्चना भांडारकर, सोनिया बैस, भारती खोब्रागडे, उज्ज्वला साखरे, श्वेता बैस आदींचे सहकार्य लाभले. या आहेत मानकरीकला क्षेत्रातून छाया अरविंद पोरेड्डीवार गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात राहूनही तैल चित्रासारख्या कलेची जोपासना करून या कलेचा प्रसार करण्याचे काम केले. या तैलचित्रांचे राज्याच्या विविध भागात प्रदर्शन भरलेत.सामाजिक क्षेत्रातून डॉ. सुधा शांतीलाल सेता शिक्षक म्हणून काम करीत असताना समाजाच्या सर्व घटकांमध्ये राहून योग विद्येचा प्रसार व स्काऊट-गाईडसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे काम केले.उद्योग व व्यवसाय क्षेत्रातून प्रीती संजय सोनकुसरेपदव्युत्तर शिक्षण घेऊन कृषी शास्त्राचा अभ्यास करून केवळ ते आपल्यापुरतेच न ठेवता त्याचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले.शैक्षणिक क्षेत्रातून भाग्यलक्ष्मी खोब्रागडेकिसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीच्या कोषाध्यक्ष म्हणून काम करताना संस्थेच्या उन्नतीसाठी व या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध विद्यालयातून चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम करण्यात येत आहे. शौर्य क्षेत्रातून तेजस्वी पाटीलनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काम करताना पोलीस विभागाचा जनसंपर्क बळकट करण्याचे काम तेजस्वी पाटील येथे करीत आहे. क्रीडा क्षेत्रातून अवंती गांगरेड्डीवारगडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात राहूनही कराटे, व्हॉलिबॉल आदीसाख्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी आपला सन्मान करण्यात आला.