राजे विश्वेश्वरराव महाराजांची जयंती साजरी
By Admin | Updated: June 2, 2014 01:15 IST2014-06-02T01:15:05+5:302014-06-02T01:15:05+5:30
नाग विदर्भ आंदोलन समितीचे प्रनेते, वेगळ्या विदर्भ राज्याचे खंदे सर्मथक

राजे विश्वेश्वरराव महाराजांची जयंती साजरी
अहेरी/सिरोंचा : नाग विदर्भ आंदोलन समितीचे प्रनेते, वेगळ्या विदर्भ राज्याचे खंदे सर्मथक विदर्भ राज्य निर्मितीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारे राजे विश्वेश्वरराव महाराज यांची जयंती अहेरी व सिरोंचा येथे साजरी करण्यात आली. अहेरी येथील विठ्ठल रूख्माई मंदिरासमोरील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राजे अम्ब्रीशराव महाराज, कुमार अवधेशरावबाबा, प्रवीणरावबाबा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच गंगाराम कोडापे, माजी प्राचार्य मद्देर्लावार, नीलकंठ बंडावार, प्रकाश सावकार गुडेल्लीवार, क्रिष्ण मंचर्लावार, प्राचार्य कत्रोजवार, किशोर मंथनवार, o्रीनिवास मगडीवार, सचिन पेदापल्लीवार, प्रमोद दोंतुलवार, शंकर मद्दीवार, विनोद भोसले, शंकर मगडीवार, अमीत गुडेल्लीवार, वलके आदी उपस्थित होते. सिरोंचा येथील नाविसच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रूग्णालयात फळवाटप केले. यावेळी डॉ. मनीष चव्हाण, डॉ. जीवणे, नागभुनम चकीनापूवार उपस्थित होते. १0 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सलाम सत्तार शेख, राजेश राजंडी, किरण संगेम, शेखर परसा, आकाश बंदेला, राम प्रसाद परसा, राजू संगेम, मधुकर संगेम, नरेश कंतीवार, o्रीनिवास बंडम, क्रांती वेमुला, शांतकुमार दुम्पला, मल्लेश वेलपुला, अनिल बंदेला, शाम गटला, विनय पेंड्याला, रामकृष्ण गटला, o्रीकांत सीलम, लक्ष्मण रेड्डी, सतीश परसा, राजकिशोर परसा, सागर संगेम, महेश दुलम यांच्यासह नाग विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)