दारू गाळण्यासाठी वापरणाऱ्या काळ्या गुळाचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:35 IST2021-05-01T04:35:04+5:302021-05-01T04:35:04+5:30

आष्टी : या परिसरात दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा अखाद्य (काळा) गूळ सुभाषग्राम येथे नेण्यासाठी आणताना आष्टी पोलिसांनी ...

Caught a truck of black jaggery used for distilling liquor | दारू गाळण्यासाठी वापरणाऱ्या काळ्या गुळाचा ट्रक पकडला

दारू गाळण्यासाठी वापरणाऱ्या काळ्या गुळाचा ट्रक पकडला

आष्टी : या परिसरात दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा अखाद्य (काळा) गूळ सुभाषग्राम येथे नेण्यासाठी आणताना आष्टी पोलिसांनी पकडला. मोठ्या ट्रकमधून गुळाच्या तब्बल २४२ पेट्यांची वाहतूक सुरू होती. हा गूळ जप्त करून ट्रकचालक, मालक आणि दोन किराणा दुकानदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु ट्रकचालक वगळता कोणालाही अटक झाली नाही.

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे न्यू जीवानी रोडवेज ट्रान्सपोर्ट, नागपूर यांच्या एमएच ४० एके ५९५३ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुळाची आयात केली जात असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी पथकासह जाऊन तपासणी केली असता ट्रकमध्ये अखाद्य गुळाच्या २४२ पेट्या आढळून आल्या. सदर गुळाचा वापर अनधिकृतपणे गुळाची दारू बनवण्यासाठी होत असल्यामुळे सदर ट्रक ताब्यात घेण्यात आला.

ही कारवाई बुधवारी (दि. २८) ला दुपारी करण्यात आली. चालक रामसिंग भैय्यालाल म्हरसकोल्हे, दीवानजी मिलिंद दुबे, चटाचल लालचंद, न्यू जीवानी रोडवेज ट्रान्सपोर्टचे मालक जेठचंद लालचंद, तसेच सुभाषग्राम येथील किशोर किराणा स्टोअर्सचे संचालक किशोर गोपाल सरकार आणि प्रिंस किराणा स्टोअर्सचे संचालक आचिंतो चंडीचरण शहा यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गूळ व ट्रकची मिळून एकूण मुद्देमालाची किंमत २१ लाख ८४ हजार रुपये एवढी आहे. ही कारवाई होऊन ४८ तास उलटले तरी दुकान मालकांना अटक न होण्यामागे काय कारण आहे, हा येथे चर्चेचा विषय आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे करीत आहेत.

Web Title: Caught a truck of black jaggery used for distilling liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.