काेरोनायोद्धा आशा स्वयंसेविकांचा लाहेरीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:18+5:302021-05-27T04:38:18+5:30

यावेळी उप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर, पोलीस उपनिरीक्षक अजय राठोड, आकाश विटे, विजय सपकाळ यांच्यासह पोलीस अंमलदार ...

Caronayodha Asha volunteers felicitated in Laheri | काेरोनायोद्धा आशा स्वयंसेविकांचा लाहेरीत सत्कार

काेरोनायोद्धा आशा स्वयंसेविकांचा लाहेरीत सत्कार

यावेळी उप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर, पोलीस उपनिरीक्षक अजय राठोड, आकाश विटे, विजय सपकाळ यांच्यासह पोलीस अंमलदार फिरोज गाठले, ईश्वर नैतम, डेव्हिड चौधरी, पंकज नवघरे, मोहन मानकर, संदीप आत्राम, वैशाली चव्हाण, वर्षा डांगे, रेश्मा गेडाम, वृषाली चव्हाण, गट प्रवर्तक महानंदा आत्राम, वैशाली मोगरे, छाया सडमेक आदी उपस्थित होत्या.

आता काेराेना लस घेण्यासाठी आशांमार्फत लाेकांना प्रवृत्त करावे लागत आहे. ही कामे पार पाडताना त्यांना कित्येकदा गावकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी समाजाची आरोग्य सेवा अबाधित राखत लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी अत्यल्प मानधनावर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत व करीत आहेत.

यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा, अशिक्षितपणामु‌ळे आदिवासी भाग असलेल्या लाहेरी परिसरामध्ये कोरोना लसीकरण करणे जणू एक आव्हानच आहे. यासाठी तहसीलदार, बीडिओ, तसेच सर्व विभाग व त्यात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत दिवस-रात्र काम करीत आहेत. त्यात आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.

अशावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, समीर शेख, सोमय मुंडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व आशा कार्यकर्ता यांची उप पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली. यामध्ये लसीकरण व्यापक व अधिक प्रभावी वेगवान करण्यासंबंधात चर्चा झाली.

बाॅक्स :

आशांवर माेठी जबाबदारी

प्रोत्साहन भत्ता आधारावर नेमणूक केलेल्या आशा कार्यकर्ता यांची मुख्य भूमिका माता व बाल आरोग्याविषयी आहे. गावातील महिलांमध्ये प्रबोधन करणे, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या आदींची माहिती मातांना देणे अशी असते. परंतु मागील दीड वर्षाहून अधिक काळ जगभर थैमान घातलेल्या कोरोना महामारीने सर्वांचे एकूण व्यवस्थापनच जणू बदलले आहे. यात आशा कार्यकर्ता यांची भूमिकाही बदलली व अधिक जोखमीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यात पुन्हा आदिवासीबहुल भागामध्ये निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा हे एक आव्हान असतेच. यात कोरोना तपासणी करणे, रुग्णांना उपचारासाठी तयार करणे आदी कामे लाहेरी पोलिसांना करावी लागत आहेत.

Web Title: Caronayodha Asha volunteers felicitated in Laheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.