पहिली लाट राेखलेल्या 54 गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:32+5:30

काेराेना हा महाभयंकर राेग असल्याचे लक्षात आल्यानंतर या राेगाचा आपल्या गावात शिरकाव हाेऊ नये, यासाठी अनेक गावांनी उपाययाेजना केल्या हाेत्या. त्यामध्ये दुसऱ्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश नाकारणे, गाव निर्जंतुकीकरण करणे, काेराेनाविषयी जनजागृती करणे, गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करणे, दुसऱ्या गावातून आलेल्या आपल्या गावातील व्यक्तीला हाेम क्वारंटाइन करणे आदी उपाययाेजना केल्या हाेत्या.

Carina's infiltration into the 54 villages where the first wave struck | पहिली लाट राेखलेल्या 54 गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव

पहिली लाट राेखलेल्या 54 गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव

ठळक मुद्दे३५५ गावांमध्ये बाधित रुग्ण; उपाययाेजनांकडे केलेे त्या गावांनी दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या पहिल्या लाटेत गाव काेराेनामुक्त ठेवण्यात यश आलेल्या ५४ गावांमध्ये दुसऱ्या लाटेत काेराेनाचा शिरकाव झाला आहे. काेराेनाबाधित गावांची संख्या पहिल्या लाटेत ३०१ एवढी हाेती. दुसऱ्या लाटेत ती संख्या ३५५ एवढी झाली आहे. 
काेराेना हा महाभयंकर राेग असल्याचे लक्षात आल्यानंतर या राेगाचा आपल्या गावात शिरकाव हाेऊ नये, यासाठी अनेक गावांनी उपाययाेजना केल्या हाेत्या. त्यामध्ये दुसऱ्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश नाकारणे, गाव निर्जंतुकीकरण करणे, काेराेनाविषयी जनजागृती करणे, गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करणे, दुसऱ्या गावातून आलेल्या आपल्या गावातील व्यक्तीला हाेम क्वारंटाइन करणे आदी उपाययाेजना केल्या हाेत्या. त्यामुळे काेराेनाला गावापासून दूर ठेवणे अनेक गावांना शक्य झाले. पहिली लाट ओसरल्यानंतर मात्र या सर्व  उपाययाेजनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे दुसऱ्या लाटेने गावात प्रवेश केला. दुसऱ्या लाटेत ५४ नवीन गावांमध्ये काेराेनाचा प्रसार झाला आहे. एकूण ३५५ गावांमध्ये काेराेनाचे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
 

यावेळी ग्रामपंचायत प्रशासन सुस्त
ग्रामीण भागात काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याची महत्वाची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नवीन सरपंच, उपसरपंच व सदस्यांची निवड झाली आहे. या पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने काम करण्याची गरज आहे. मात्र हे पदाधिकारी घरात बसून असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. पहिल्या लाटेप्रमाणेच नागरिकांमध्ये जागृती करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने उचलली पाहिजे.

ताेडसा ग्रामपंचायतींतर्गत पेठा, ताेडसा, एकरा बुज, एकरा खुर्द, झारेवाडा, आलेंगा, कारमपल्ली, लांजी, दाेडी ही गावे येतात. या गावांमध्ये एकूण ४ हजार ७६० लाेकसंख्या आहे. काेराेनाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ठिकठिकाणी पाेस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले. त्यामुळे नागरिक मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, शहरापासून दूर राहणे या बाबींवर भर दिला. त्यामुळेच या सर्व गावांमध्ये अजूनही काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
- प्रशांत आत्राम, सरपंच, ताेडसा
 

गुरनाेली गावाला काेराेनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला. मात्र, याला यश आले नाही. दुसऱ्या लाटेत काेराेनाचे रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी काेराेनाचा संसर्ग हाेणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे.
- सुप्रिया गणेश तुलावी, 
सरपंच, गुरनाेली

काेरची तालुक्यातील १४ नवीन गावांमध्ये काेराेना
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेरची तालुक्यातील १४ नवीन गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाला. अहेरी तालुक्यात ४, आरमाेरी ३, भामरागड ९, चामाेर्शी ३, धानाेरा २, एटापल्ली २, गडचिराेली १, कुरखेडा ९, मुलचेरा ३, सिराेंचा ४ व देसाईगंज तालुक्यातील एका नवीन गावामध्ये दुसऱ्या लाटेत काेराेनाचा शिरकाव झाला आहे.

 

Web Title: Carina's infiltration into the 54 villages where the first wave struck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.