बिनधास्त तरुणांमुळेच वाढताेय काेराेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST2021-04-13T05:00:00+5:302021-04-13T05:00:31+5:30

घरातील सर्वच जण पाॅझिटीव्ह झाल्याने संपूर्ण कुटुंबाला दवाखान्यात भरती व्हावे लागत आहे. दुसऱ्या लाटेत एकूण तीन हजार ३३५ नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यात २१ ते ३० या वयाेगटातील ६९८ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २०.९३ टक्के एवढे आहे. ३१ ते ४० या वयाेगटातील ६७७ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण २०.३० टक्के एवढे आहे. 

Carina grows only because of young people | बिनधास्त तरुणांमुळेच वाढताेय काेराेना

बिनधास्त तरुणांमुळेच वाढताेय काेराेना

ठळक मुद्देखबरदारीची गरज : कुठेही न जाता अनेक बालके व ज्येष्ठांना हाेत आहे बाधा

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शाळा बंद असल्याने लहान मुले घरीच आहेत, तर काेराेनाची भीती निर्माण झाल्यापासून ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. तरुणांना मात्र कामानिमित्त बाहेर पडावेच लागते. त्यामुळे त्यांना बाधा हाेण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे बाहेरून आल्यानंतर अनावधानाने त्यांच्यापासून घरात काेराेनाचे विषाणू पसरून इतरही जण पाॅझिटीव्ह हाेत आहेत. 
घरातील सर्वच जण पाॅझिटीव्ह झाल्याने संपूर्ण कुटुंबाला दवाखान्यात भरती व्हावे लागत आहे. दुसऱ्या लाटेत एकूण तीन हजार ३३५ नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यात २१ ते ३० या वयाेगटातील ६९८ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २०.९३ टक्के एवढे आहे. ३१ ते ४० या वयाेगटातील ६७७ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण २०.३० टक्के एवढे आहे. 
वयाेगटाचा विचार केल्यास सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० या वयाेगटातील आहेत. हा वयाेगट काम करणारा असल्याने घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. कामानिमित्त घराबाहेर पडताना व कामाच्या ठिकाणी याेग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग हाेतो. घरी आल्यानंतरही विशेष काळजी घेणे आवश्यक असताना अनेक जण बिनधास्तपणे वागत आहेत.

अनेकांचा सहकुटुंब रुग्णालयात मुक्काम
तरुणांनी काळजी न घेतल्याने अनेक कुटुंब काेराेनाबाधित हाेऊन रुग्णालयांमध्ये एकत्र उपचार घेत आहेत. संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल झाल्याने घराला कुलूप लागली आहेत. गडचिराेली शहरात अशी अनेक कुटुंब आढळून येतात. घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चुकून काेराेनाची लागण हाेऊ शकते. मात्र त्याला जरी लागण झाली तरी घरी आल्यानंतर याेग्य ती काळजी घेतल्यास इतरांना संसर्गापासून वाचविणे शक्य आहे. त्याबाबत अजुनही शहरी आणि ग्रामीण भागात जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे.

 

 

Web Title: Carina grows only because of young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.