तुळशी येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:58+5:302021-04-08T04:36:58+5:30
यावेळी सरपंच चक्रधर नाकाडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन सडमेक, ग्रामसेवक पुरुषोत्तम बनपूरकर, पोलीस पाटील तेजस्विनी दुनेदार, विष्णू दुनेदार, ...

तुळशी येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरण सुरू
यावेळी सरपंच चक्रधर नाकाडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन सडमेक, ग्रामसेवक पुरुषोत्तम बनपूरकर, पोलीस पाटील तेजस्विनी दुनेदार, विष्णू दुनेदार, समुदाय वैद्यकीय अधिकारी डाॕॅ. प्रियंका नाकाडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन रामटेके, आरोग्य सहायक जी.पी. कुर्वे, आरोग्य सेवक ललित बडोले,आरोग्य सेविका एस.एन. मेश्राम, भोयर, आशा वर्कर शीला रामटेके, हिरकन्या रामटेके, विश्रांती लोणारे उपस्थित होते. ४५ वर्षावरील वयोगटातील व्यक्तींनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. तुळशी येथे बुधवार १४ एप्रिल वगळता पुढील पाच बुधवार लसीकरण केले जाणार आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सडमेक यांनी केले.