चंदनखेडीजवळ कारला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:38 IST2017-11-27T23:38:19+5:302017-11-27T23:38:35+5:30
सिरोंचावरून ब्रह्मपुरीकडे जाणाºया अरविंद उईके यांच्या कारला चंदनखेडी गावाजवळ अपघात झाला.

चंदनखेडीजवळ कारला अपघात
आॅनलाईन लोकमत
आष्टी : सिरोंचावरून ब्रह्मपुरीकडे जाणाºया अरविंद उईके यांच्या कारला चंदनखेडी गावाजवळ अपघात झाला. यामध्ये कार क्षतिग्रस्त झाली. सदर अपघात सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली.
अरविंद उईके हे सिरोंचा येथून एमएच ३४ एएम ६८४३ क्रमांकाच्या कारने ब्रह्मपुरी येथे जात होते. आष्टीवरून आलापल्लीकडे जाणाºया ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक उईके यांच्या कारच्या दिशेने आली. ट्रकच्या धडकेपासून वाचण्यासाठी उईके यांची कार रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटली. यामध्ये कारचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला. याबाबतची माहिती आष्टी पोलीस स्टेशनला देण्यात आली.