शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

'त्या' वाघिणीचे कॉलर आयडी होते सहा महिन्यांपासून बंद; वनविभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:00 PM

मृत्यूचे कारणही अद्याप अस्पष्ट

गडचिरोली: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या जंगलातील टी-४९ वाघिणीचा बछडा असलेल्या तीन वर्षीय वाघिणीचा मृतदेह शनिवारी (दि.१८) गडचिरोली जिल्ह्यात आढळला. सदर वाघिणीचा कॉलर आयडी तब्बल ६ महिन्यांपासून कामच करत नसल्याची बाब पुढे आली आहे.सदर वाघिणीचे अस्तित्व ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात होते. तिच्या हालचाली टिपण्यासाठी कॉलर आयडी लावण्यात आले होते आणि त्याचे सनियंत्रण देहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या वतीने केले जात होते. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा सदर कॉलर आयडीने काम करणे बंद केले त्यावेळी डेहराडून येथील संस्थेकडून ही बाब वनविभागाला कळविण्यात आली होती. तेव्हापासून सदर वाघिणीच्या हालचाली माहित नसताना त्याबाबत किंवा सदर वाघिणीला शोधून कॉलर आयडी पुन्हा कार्यरत करण्यासाठी वनविभागाने गंभीरपणे दखल घेतली नसल्याचे दिसून येते.वाघिणीच्या मृत्यूनंतर जवळपास २० दिवसांनी तिच्या मृत्यूबाबतची माहिती वनविभागाला समजली. यावरून वनक्षेत्रात प्रामाणिकपणे गस्तही होते किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे वयाने तरूण असलेल्या सदर वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मृत वाघिणीच्या गळ्यातील कॉलर आयडी डेहराडून येथील वन्यजीव संस्थेला पाठविण्यात आले असून ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रापासून ५० किमीपेक्षा जास्त अंतर पार करून ही वाघिण गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा बिटमध्ये कोणत्या मार्गे आणि कधी पोहोचली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी शि. र. यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.