रेगडी पाेलिसांनी सुरू केली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST2022-01-08T05:00:00+5:302022-01-08T05:00:26+5:30
मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. रेगडी परिसरातील विद्यार्थी घोट व चामोर्शी येथील शाळेत जातात. तसेच शासकीय, खासगी कामानिमित्त घोट व चामोर्शी येथे जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. खासगी वाहनांचे भाडे न परवडणारे असल्याने विद्यार्थी व नागरिकांचे खूपच हाल होत असल्याचे पीएसआय शिंब्रे यांना लक्षात आले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने रेगडी-घोट-चामोर्शी अशी पोलीस दादालोरा बस सुरू केली आहे.

रेगडी पाेलिसांनी सुरू केली बस
लाेकमत न्यूज नेटवर्क
घोट : उप विभागीय पोलीस अधिकारी, प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने रेगडी पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय शिंब्रे यांनी बससेवा सुरू केली आहे. हिरवी झेंडी दाखवून बसचा शुभारंभ करण्यात आला.
मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. रेगडी परिसरातील विद्यार्थी घोट व चामोर्शी येथील शाळेत जातात. तसेच शासकीय, खासगी कामानिमित्त घोट व चामोर्शी येथे जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. खासगी वाहनांचे भाडे न परवडणारे असल्याने विद्यार्थी व नागरिकांचे खूपच हाल होत असल्याचे पीएसआय शिंब्रे यांना लक्षात आले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने रेगडी-घोट-चामोर्शी अशी पोलीस दादालोरा बस सुरू केली आहे.
६० वर्षांवरील नागरिकांना ही बस मोफत असल्याचे सांगून इतर नागरिकांना बस एवढेच भाडे राहणार आहे. बस शुभारंभप्रसंगी रेगडी ते घोट जाणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवास मोफत असल्याचे सांगितले.