राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात फसली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST2021-09-12T05:00:00+5:302021-09-12T05:00:34+5:30
दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे.शनिवारी एक खासगी प्रवासी बस त्या ठिकाणच्या चिखलात फसली. या भागात तेलंगणा आणि छत्तीसगडमधील प्रवाशांची वर्दळ असते.

राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात फसली बस
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील सोमनपल्ली नाल्यावर उभारला जात असलेला पूल अर्धवट स्थितीत आहे. या पुलालगत रहदारीसाठी तयार केलेल्या रस्ता आता सततच्या पावसामुळे चांगलाच चिखलमय झाला आहे. मार्गावर चक्क दोन फुटांपेक्षा जास्त चिखलाचा थर झाल्यामुळे शनिवारी एक प्रवासी बस त्या चिखलात फसली.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे.
शनिवारी एक खासगी प्रवासी बस त्या ठिकाणच्या चिखलात फसली. या भागात तेलंगणा आणि छत्तीसगडमधील प्रवाशांची वर्दळ असते. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे या प्रवाशांना फटका बसत आहे.