लभानतांडाजवळ बसचा अपघात
By Admin | Updated: June 22, 2017 16:39 IST2017-06-22T16:39:26+5:302017-06-22T16:39:26+5:30
आलापल्ली चंद्रपूर मार्गावरील लभानतांडा जवळील असलेल्या वळणावर आज दुपारी २.३० वाजता बसचा अपघात होऊन ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

लभानतांडाजवळ बसचा अपघात
आॅनलाईन लोकमत
अहेरी:- आलापल्ली चंद्रपूर मार्गावरील लभानतांडा जवळील असलेल्या वळणावर आज दुपारी २.३० वाजता बसचा अपघात होऊन ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.
एमएच ४० वाय ५५८४ नागपूर आगाराची बस ही अहेरी पासून नागपूर साठी अहेरी आगरातून २.१५ वाजता निघाली. आलापल्ली पासून ४ किमी अंतरावर असलेल्या लभानतांडा जवळ असलेल्या वळणावर या बस ची स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची झाडाला जोरदार धडक बसली यात ९ प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच डॉ त्रिवेंद्र कटरे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात आणण्यात आल्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी,डॉ संजय उमाटे,डॉ दीपक मुंडे यांनी रु ग्णांवर उपचार केले. यापैकी पोष्का काटलू यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी ही रु ग्णालयात भेट देऊन माहिती घेतली.
बस चालकाच्या प्रसांगवधाने बस मधील प्रवाश्याचे जीव वाचले असून स्टेरिंग लॉक झाल्यावर वेग कमी करून बस थांबविण्याचा प्रयत्न केला होता मात्र यात बस पलटी न मारता झाडावर आदळली. एसटी विभागाचे लिपिक वामन चिप्पावार व चरण चहारे यांनी रु ग्णालयात जखमींची भेट घेतली.