कंगनाच्या पुतळ्याचे दहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
गडचिरोली शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रियाज शेख, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरूण धुर्वे यांच्या मार्गदर्शनात अहेरी तालुका प्रमुख सुभाष घुटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना रानावतच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर या पुतळ्याला आग लावून त्याचे आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात दहण करण्यात आले. कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करून तिच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

कंगनाच्या पुतळ्याचे दहण
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : बॉलिवुडची अभिनेत्री कंगना रानावत हिने महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलीस यांच्याबाबत अपशब्द उच्चारले. याबाबत आलापल्ली येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंगनाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तिचा निषेध केला आहे.
गडचिरोली शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रियाज शेख, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरूण धुर्वे यांच्या मार्गदर्शनात अहेरी तालुका प्रमुख सुभाष घुटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना रानावतच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर या पुतळ्याला आग लावून त्याचे आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात दहण करण्यात आले. कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करून तिच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेच्या अनु शेडमाके, विश्व कारवा, सुनिता घुटे, साईनाथ कोलपकवार, दिलीप सुरपाम, नितेश यमुलवार, सज्जू शेख, अंकूश मंडलवार, विजय तोराम, कृष्णा आत्राम, विष्णू पूर्वा, ललित जयत, नागेश बंडावार, प्रितम सरकार, महेश वायकर, वसंत यादव हजर होते.