रॉकेल ओतून पत्नीला जाळले
By Admin | Updated: June 2, 2014 01:11 IST2014-06-02T01:11:18+5:302014-06-02T01:11:18+5:30
दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

रॉकेल ओतून पत्नीला जाळले
कोरची : दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, दारूड्याने पतीने पत्नीवर रॉकेल ओतून जीवंत जाळले. यात पत्नी ९५ टक्के जळाल्याने पत्नीला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ६.३0 वाजताच्या दरम्यान कोरची येथे घडली. सीमा प्रदीप शेडमाके (२९) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. मृतक सीमाचा पती प्रदीप शेडमाके हा दारूसाठी पत्नीकडून नियमित पैसे मागायचा. रविवारी सकाळी ६.३0 वाजता दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की, दारूड्या प्रदीप शेडमाकेने पत्नी सीमावर रॉकेल ओतले व तीला जीवंत जाळले. सीमाने आरडोओरड केल्याने शेजारील नागरिक धावून आले. परंतु सीमा ९५ टक्के जळाल्याने कोरची येथील रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. यावेळी तहसीलदार खंडारे यांनी सीमाचा बयाणा घेतला असता पती प्रदीप शेडमाके याने माझ्यावर रॉकेल ओतून जीवंत जाळले, असे सीमाने सांगितले. सीमाची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तीला उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असताना वाटेतच तीचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आरोपी प्रदीप शेडमाके याला पोलिसांनी अटक करून ३0७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा कोरची येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात चपराशी पदावर कार्यरत आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ तो दारू पीत होता. सीमाच्या पश्चात चार महिने, पाच वर्षाची अशा दोन मुली आहेत. परंतु दारूच्या व्यसनाने मुलींचे मातृत हिरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)