रांगी आरोग्य केंद्रासमोर मूत्रीघर बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:56+5:302021-03-26T04:36:56+5:30
रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील दोन्ही बाजूने थेट गडचिरोलीवरून रस्ता येतो तर दुसरा रस्ता धानो-यावरून तर तिसरा रस्ता ...

रांगी आरोग्य केंद्रासमोर मूत्रीघर बांधा
रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील दोन्ही बाजूने थेट गडचिरोलीवरून रस्ता येतो तर दुसरा रस्ता धानो-यावरून तर तिसरा रस्ता आरमोरीवरून येतो. या तिन्ही मार्गांचा टी-पाॅइंट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसमोर आहे. या ठिकाणी आरमोरी, धानोरा व गडचिरोलीवरून चारचाकी व दुचाकी वाहने येतात. एसटी बसचा थांबा असल्याने बसही याच ठिकाणी थांबतात. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र या ठिकाणी मूत्रीघर नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
विशेष करून महिला प्रवाशांची अधिक अडचण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायतीने मूत्रीघर बांधण्याची मागणी आहे. या ठिकाणी प्रवासी निवारासुद्धा बांधण्यात आला नाही. झाडाच्या सावलीत राहून बसची वाट बघावी लागते. स्थानिक आमदार निधीतून या ठिकाणी प्रवासी निवारा बांधण्यात यावा, अशीही मागणी केली जात आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सदर विकास कामे करण्याची मागणी होत आहे.