आष्टी येथे कोविड केअर सेंटर निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:37 IST2021-05-13T04:37:33+5:302021-05-13T04:37:33+5:30
एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा आदी भागांतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गडचिरोली येथे नेण्यासाठी १५० ते २०० किमी अंतर जावे ...

आष्टी येथे कोविड केअर सेंटर निर्माण करा
एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा आदी भागांतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गडचिरोली येथे नेण्यासाठी १५० ते २०० किमी अंतर जावे लागते. त्यामुळे एवढ्या दूर रुग्णांना नेताना रुग्ण दगावण्याची शक्यता असते. सध्या गावागावात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी बऱ्याच गावातील रुग्ण येतात. त्यामुळे या ठिकाणी कोविड केअर सेंटर देण्यात यावे, अशी मागणी ग्रा.पं.च्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी सरपंच बेबीताई बुरांडे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं.सदस्य राकेश बेलसरे, कपिल पाल, संतोष बारापात्रे, छोटू दुर्गे, प्रकाश बोभाटे आदी उपस्थित होते.