पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: July 16, 2016 01:37 IST2016-07-16T01:37:47+5:302016-07-16T01:37:47+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत सर्वसामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

Bring party policies to the general public | पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

राष्ट्रवादी काँग्रेसची सभा : धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत सर्वसामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पक्षाची ही ध्येय, धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी शाखा गडचिरोलीच्या वतीने पक्ष कार्यालयात शुक्रवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धर्मरावबाबा आत्राम बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ऋतूराज हलगेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, माजी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, रायुकाँ जिल्हाध्यक्ष ऋषीकांत पापडकर, सेवादल प्रदेश सचिव प्रा. खुशाल वाघरे, विद्यार्थी प्रतिनिधी लिलाधर भरडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष तुकाराम पुरनवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष नंदलाल लाडे, शहर अध्यक्ष नितीन खोबरागडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर गडचिरोली शहरातील सर्व वार्ड अध्यक्ष महिला पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Bring party policies to the general public