तुरुंगवासाची भीती दाखवून घेतली लाच; आरएफओसह, आरओ, गार्डवर गुन्हा दाखल

By गेापाल लाजुरकर | Updated: February 9, 2025 20:35 IST2025-02-09T20:34:21+5:302025-02-09T20:35:03+5:30

आलापल्लीत कारवाई, एक लाखाची मागणी; ८३ हजार रुपये घेतले...

Bribe taken by fear of imprisonment; Case registered against RFO, RO, guard | तुरुंगवासाची भीती दाखवून घेतली लाच; आरएफओसह, आरओ, गार्डवर गुन्हा दाखल

तुरुंगवासाची भीती दाखवून घेतली लाच; आरएफओसह, आरओ, गार्डवर गुन्हा दाखल


गडचिराेली : शासकीय याेजनेतून घरकुलाच्या बांधकामाकरिता विटा बनविण्यासाठी माती गावालगतच्या नाल्यातून ट्रॅक्टरमध्ये भरत असताना वनपालाने पाहिले. गुन्ह्याची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजाेडीनंतर ८३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल (राऊंड ऑफिसर) यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ८ फेब्रुवारी राेजी आलापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी वनपालासह आरएफओ व वनरक्षकावरही गुन्हा नाेंद करण्यात आला.

माराेती संभाजी गायकवाड (वनपाल), ममता नामदेव राठाेड (वन परिक्षेत्र अधिकारी), गणेश उत्तम राठाेड (वनरक्षक) अशी गुन्हा नाेंद झालेल्या आराेपींची नावे आहेत. तक्रारदार हे नाल्यातून नातेवाईकाच्या ट्रॅक्टरमध्ये त्यांच्याच मदतीने माती भरत असताना तानबाेडी उपक्षेत्राचे वनपाल माराेती संभाजी गायकवाड हे त्या ठिकाणी पाेहाेचले. घरकुलधारकास गुन्ह्याची भीती दाखवून कारवाई न करण्यासाठी १ लाख १० हजार रुपये आलापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात घेऊन येण्यास सांगत स्पष्ट लाचेची मागणी केली व ट्रॅक्टर वन परिक्षेत्र कार्यालयात घेऊन गेले हाेते.

वनरक्षकानेही मागितले ३५ हजार
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. याविराेधात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पाेलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढाेले यांच्याशी संपर्क करून तक्रार केली. तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी करीत असताना फिरत्या पथकातील वनरक्षक गणेश राठाेड याने वरिष्ठांना भेटून प्रकरण साैम्य दंडात्मक कारवाई करीत परस्पर मिटवून देण्याकरिता तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची मागणी केली.

१७ हजार रक्कम दाखविली दंडात
आरएफओ राठाेड यांच्या दालनातून बाहेर आल्यानंतर माराेती गायकवाड याने १ लाख रुपयांची लाच मागून पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने संबंधितांविराेधात सापळा रचण्यात आला. आरएफओ राठाेड यांच्या समक्ष माराेती गायकवाड याने तक्रारदारास १७ हजार रुपयांच्या दंडाची पावती देऊन ८३ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना अटक केली. रविवारी त्याला अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

 

Web Title: Bribe taken by fear of imprisonment; Case registered against RFO, RO, guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.