शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस निरिक्षक निलंबित

By admin | Updated: March 6, 2015 01:30 IST

गिट्टी भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी ७ हजार रूपयाची लाच घेणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील ...

गडचिरोली : गिट्टी भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी ७ हजार रूपयाची लाच घेणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ५ मार्च रोजी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरिक्षक, पोलीस पाटील व वनरक्षक अशा तिघांना लाच घेताना अटक केली आहे. या दोन्ही घटना चामोर्शी तालुक्यातील आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील लाचखोरांविरूध्द आक्रमक पाऊल या वर्षभरात उचलले असून शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये लाचखोरीविरूध्द जनजागृती करण्यासाठी प्रसिध्दी पत्रकही जारी केले आहेत. तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. गेल्या दोन महिन्यांत नागपूर विभागात ४१ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षात २०१४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १७ लाचखोरांविरूध्द कारवाई केली आहे. त्यामुळे लाचखोरांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सापळ्यात अडकलेल्या लाचखोरांमध्ये काही मोठे अधिकारी व लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. आजपर्यंतच्या एसीबीच्या इतिहासात जिल्ह्याचीही सर्वाधिक सरस कामगिरी मागील वर्षी राहिली. यावर्षात जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता अरविंद चव्हाण याच्यावर अपसंपदेच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोरीतील बहुतांशी जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच राज्यातील १० अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. यात जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. वन विभागाने लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या मार्र्कंडा (कं) येथील वनरक्षक नारायण दिगांबर सोळंखे याला निलंबित केलेले नाही. मात्र पोलीस अधीक्षकांनी तत्काळ पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याच्यावर निलंबनाचा बडगा उगारला.