भिंत तोडून ट्रकची झाडाला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:43 IST2018-04-19T23:43:04+5:302018-04-19T23:43:11+5:30
धानाचे पोते घेऊन देसाईगंजकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने आरमोरी जवळ विजेच्या खांबासह रेशीम कार्यालयाची संरक्षण भिंत तोडून झाडाला धडक दिली. या अपघातात वाहनचालक जखमी झाला. सदर अपघात बुधवारी रात्री ११ वाजता घडला.

भिंत तोडून ट्रकची झाडाला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : धानाचे पोते घेऊन देसाईगंजकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने आरमोरी जवळ विजेच्या खांबासह रेशीम कार्यालयाची संरक्षण भिंत तोडून झाडाला धडक दिली. या अपघातात वाहनचालक जखमी झाला. सदर अपघात बुधवारी रात्री ११ वाजता घडला.
शाकीर नोमा रहीम शेख (४५) रा. कमलानगर असे ट्रक चालकाचे नाव आहे. कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथून महामंडळाचे धानाचे पोते घेऊन ट्रक वैरागड मार्गे आरमोरीवरून देसाईगंजकडे जात होता. दरम्यान ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने बीएसएनएलच्या खांबाला व वीज खांबाला धडक दिली. धडकेमुळे खांबासह विजेच्या ताराही तुटल्या. त्यानंतर संरक्षण भिंतीला पार करून ट्रकने झाडाला धडक दिली. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी वाहनचालकाला आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.