ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST2021-12-25T05:00:00+5:302021-12-25T05:00:43+5:30

कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दरम्यान त्या ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी वाहनावरील दोन युवकांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी काळीपिवळी वाहनाची दुचाकीला (एमएच ३६, आर ३२८३) जबर धडक बसली.

Both lost their lives in the attempt to overtake | ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव

ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव

लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरची : एका ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील दोन युवकांना समोरून येणाऱ्या काळीपिवळी जीपची जबर धडक बसली. यात दोघांनाही जागेवरच प्राण गमवावे लागले. हा अपघात कोरचीपासून सहा किलोमीटरवर असलेल्या बोडेना गावसमोरील वळणावर शुक्रवारच्या दुपारी झाला.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दरम्यान त्या ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी वाहनावरील दोन युवकांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी काळीपिवळी वाहनाची दुचाकीला (एमएच ३६, आर ३२८३) जबर धडक बसली. त्यात नीलकुमार रावजी आचले (२३ वर्षे) आणि प्रकाश बुधराम हिडामी (३१ वर्षे), दोघेही रा. फुलगोंदी हे रस्त्यालगत फेकल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच कोरची पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक समाधान फडोड, हवालदार रामलाल हिडामी, पोलीस शिपाई विष्णू उरकुडे घटनास्थळी दाखल झाले. 

दुचाकी फरफटत गेली
ट्रकच्या मागून पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीची काळीपिवळीला समोरासमोर जबर धडक बसली. यावेळी दुचाकी काळीपिवळीच्या बंपरला अडकली आणि दुचाकीला फरफटत नेत काळीपिवळी गाडीही रस्त्याखाली उतरली. दुचाकीस्वार निलकुमारची कंबर व हातपाय मोडले असून छातीलाही जबर मार लागला. मागे बसलेल्या प्रकाशच्या डोक्याला जबर मार लागला. 

हेल्मेट असते तर...
या अपघातातील दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यातील प्रकाश हिडामी याचा मृत्यू तर डोक्याला मार लागूनच झाला. त्यामुळे त्याने जर डोक्यात हेल्मेट घातलेले असते तर त्याचा जीव वाचला असता हे स्पष्ट होते. तो विवाहित असून त्याला दोन मुली, एक मुलगा व पत्नी तसेच आई-वडील आहेत. हे कुटुंब उघड्यावर पडले.

 

Web Title: Both lost their lives in the attempt to overtake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात