शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग व अनियमितता

By admin | Updated: December 25, 2016 01:42 IST

१८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी

फेर निवडणूक घ्या : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार गडचिरोली : १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी भाजप पक्षाने सत्ता, संपती, प्रशासन व पोलीस बळाचा वापर करून बुथ कॅप्चरींग केले. अनेक केंद्रांवर घोळ करून मतदान प्रक्रियेत अनियमितता केली, अशी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे काँग्रेस, राकाँ, शिवेसना व युवाशक्तीच्या पराभूत उमेदवारांनी केली असून गडचिरोली पालिकेची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला जयवंत देशमुख, डॉ. अश्विनी धात्रक, संगीता कात्रटवार, सुषमा राऊत, कैलाश शर्मा, बाळू टेंभुर्णे, काशिनाथ भडके, बाळू मडावी, निशांत पापडकर, अमोल कुळमेथे, सुनिता भोयर आदी उपस्थित होते. यावेळी जसवंत देशमुख यांनी सांगितले की, संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करून गडचिरोली नगर पालिका निवडणुकीची प्रक्रिया बेकायदेशीररित्या पार पाडण्यात आली. जाहीर झालेल्या निकालात प्रदत मतदानाची आकडेवारी शुन्य दाखविण्यात आली आहे. यादीत वेगळ्या प्रतिनिधींच्या नावांचा समावेश आहे. मात्र बूथवर पक्षाचे दुसरेच प्रतिनिधी देण्यात आले. अनेक केंद्रांवर इव्हीएम मशीन बदलल्या. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया निर्भीडपणे पार पाडली नाही. परिणामी नागरिकांना बहाल करण्यात आलेल्या संविधानिक मतदानाच्या अधिकाराची हत्याच सत्ताधारी भाजप व प्रशासनाने केली आहे. तसेच मतदान प्रक्रियेत घोळ करण्याचा पूर्वनियोजित कट प्रशासन व भाजपचा होता, असा आरोप जयवंत देशमुख यांनी केला. सुरूवातीला आपल्याला पाच मतांनी विजयी झाल्याचे मतमोजणी कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पाऊण तासाने भाजपच्या उमेदवार पूजा बोबाटे यांना अडीचशे मतांनी विजयी घोषीत करण्यात आले, अशी माहिती प्रभाग क्रमांक १२ च्या पराभूत उमेदवार सुनिता भोयर यांनी सांगितली. प्रभाग गोकुलनगर क्रमांक १२ च्या मतदान केंद्रावर प्रात्यक्षिकावेळी ज्या इव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या, त्या ईव्हीएम मशीन मतदानाच्या दिवशी त्या केंद्रांवर दिसून आल्या नाही. पाहणी केली असता, या मशीनचे क्रमांक बदलल्याचे दिसून आले, असे पराभूत उमेदवार बाळू टेंभुर्णे यांनी सांगितले. गोकुलनगर येथील रहिवासी मतदार प्रशांत डोमाजी वैरागडे हे प्रभाग क्रमांक १२ च्या तुलतुली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गेले असता, त्यांच्या नावावर मतदान झाले असल्याचे तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तक्रार करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप पराभूत उमेदवार बाळू मडावी यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)