मार्कंडादेव येथे अस्थी विसर्जनासाठी आणू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:35+5:302021-04-21T04:36:35+5:30
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दररोज कोरोना रुग्ण दगावत आहेत. दगावलेल्या व अन्य व्यक्तींच्या अस्थी विसर्जन ...

मार्कंडादेव येथे अस्थी विसर्जनासाठी आणू नये
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दररोज कोरोना रुग्ण दगावत आहेत. दगावलेल्या व अन्य व्यक्तींच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी दररोज मोठी संख्या वाढत चालली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील व परजिल्हातील भाविकांनी कोरोना संकट काळात मार्कडादेव येथे अस्थी विसर्जन करण्यासाठी आणू नये अशी मागणी कोविड-१९ ग्रामस्तरीय कृती समितीने केली आहे.
जिल्ह्यात संचारबंदी लागू करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. अशातच कोरोना संकट अधिक वाढत चालले आहे. त्यामुळे गावातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील व परजिल्हातील भाविकांनी व नागरिकांनी सध्या अस्थी व अन्य कुठलेही कार्यक्रम सध्या मार्कडादेव येथे करू नये. असा ठराव ग्रामस्तरीय कृती समितीने घेतला आहे.
अस्थी व इतर क्रियाक्रम कार्यक्रम होत आहेत. याचा स्थानिक जनतेला त्रास होत आहे. गर्दीमुळे कोरोना रोगाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या गंभीर समस्येची भाविकांनी दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्तरीय कृती समितीने केली आहे. सभेला अध्यक्ष उज्ज्वल गायकवाड, सचिव श्रीकृष्ण मंगर, एस . पी . भरडकर, डॉ. सुजित मेश्राम, भुजंग आभारे, आरती आभारे, पुष्पा कोडापे, विद्या गरमळे, शैला कोडापे, गीता पांडे, राजू मोगरे , शकुंतला सारपे ,सुनीता जंजालकर, व्ही. एस. अंबाडकर यांनी केली आहे.