नदीपात्रात मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:30 IST2018-03-19T23:30:37+5:302018-03-19T23:30:37+5:30

येथील कोत्तुर रोड, वॉर्ड नं.२ मधील रहिवासी सूरज मुतय्या भोगावार (२३) या युवकाचा मृतदेह सोमवारी प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर आढळला. तो गेल्या गुरूवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

The body of missing boy found in river bed | नदीपात्रात मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह

नदीपात्रात मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह

ठळक मुद्देमृत्यूचे कारण गुलदस्त्यात : गुरूवारपासून होता गायब

आॅनलाईन लोकमत
अहेरी : येथील कोत्तुर रोड, वॉर्ड नं.२ मधील रहिवासी सूरज मुतय्या भोगावार (२३) या युवकाचा मृतदेह सोमवारी प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर आढळला. तो गेल्या गुरूवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सुरज हा पंचायत समितीत संगणक परिचालक म्हणून कार्यरत होता. दि.१५ ला आपले काम आटोपून कार्यालयातून निघून गेला. मात्र घरी आलाच नाही. तो एखाद्या मित्राकडे असेल असे कुटुंबियांना वाटले. पण शनिवारी संध्याकाळी गावातील एका इसमाला त्याची सायकल प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटाजवळील पुलाच्या रपट्याजवळ दिसली.
तीन दिवसांपासून सुरजचा शोध लागला नसल्याने आणि मोबाईलसुद्धा बंद असल्याने. रविवारी सकाळी मोठे भाऊ शिवकुमार भोगावार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास सुरजचा मृतदेह नदीपात्रात दिसला. तो मृतदेह बाहेर काढून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मागे आई, भाऊ, वहिनी, पुतण्या असा आप्त परिवार होता.

Web Title: The body of missing boy found in river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.