बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:42+5:30
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र समुहाकडून दरवर्षी बाबुजींच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र समुहाकडून दरवर्षी बाबुजींच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी विविध संघटना, कर्मचारी, सखी मंच सदस्य व इतर रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखीमंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे यांनी केले आहे.
नियमांचे पालन
रक्तदानासाठी येताना नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रूमाल लावून यावे. एकावेळी गर्दी टाळण्यासाठी रक्तदात्यांनी शक्यतो ७४९९९०४७६४ या क्रमांकावर फोन करून यावे. रक्तदानाच्या ठिकाणी सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.